संत सावता माळी 'प्रपंची असुनि परमार्थ साधावा । वाचे आठवावा पांडुरंग।
संत सावता माळी स्वतः पंढरपूरला जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांना पाणी, भाकरी, फळे, फुले देऊन त्यांची पूजा करत असत. आपल्या रोजच्या कमावले त्यांना पंढरपूल जाणे शक्य नव्हते. आपला मळा हेच माझे पंढरपूर असे ते नेहमी म्हणत असत. रोज मळ्यात कष्ट करणे, लागणाऱ्या भाज्या आणि फळे पिकवणे, वाटसरूला आपल्यातील थोडे जेवण देणे हीच पांडुरंगाची पूजा आणि भक्ती आहे असे ते म्हणत असत. स्वतः भगवान पांडुरंग माझ्या शेतात राहतो असे म्हणणारे सावता माळी कधीच पंढरपूरला गेले नाहीत.
संत सावता माळी यांनी आपले शेतीचे काम करत वारकरी पंथाचे, धार्मिक प्रबोधनाचे कार्य केले. संत सावता माळी यांनी अध्यात्म आणि भक्ती, आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य आणि सदाचार यांचा मेळ घातला.
संत सावता माळी यांचे अभंग
‘आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत’
‘कांदा मुळा भाजी अवघी |विठाबाई माझी’’
’’लसुण मिरची कोथंबिरी | अवघा झाला माझा हरि ||’
आपल्या कामामुळे पांडुरंगाला पाहायला पंढरपूरला जाता येत नसल्यामुळे सावता माळी यांनी आपला मला यालाच पंढरपूर मानले आहे.
‘स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातो हात।’
‘सावत्याने केला मळा। विठ्ठल देखियला डोळा।’
या ओळींतून त्यांची आपल्या जीवनाबद्दलची निष्ठा स्पष्ट होते. त्यांच्या अभंगांत नवरसांपैकी वत्सल, करुण, शांत, दास्य-भक्ती हे रस आढळतात.
‘योग-याग तप धर्म । सोपे वर्म नाम घेता।।
तीर्थव्रत दान अष्टांग। याचा पांग आम्हा नको।।
नामसंकीर्तनावर त्यांनी जास्त भर दिला. पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी सर्व त्याग करून घेणायची गरज नाही तर आपण प्रपंच करत असताना सुद्धा पांडुरंगाला भेटू शकते असे त्यांचे मत होते.
‘प्रपंची असूनि परमार्थ साधावा। वाचे आळवावा पांडुरंग
मोट, नाडा, विहीर, दोरी। अवघी व्यापिली पंढरी,’
आपले काम करत करत सुद्धा पण पांडुरंचे नामस्मरण करू शकतो, आपला संसार, आपला मळा, विहीर यातच आपली पंढरी आहे असे ते म्हणतात.
.jpeg)
🙏 पांडुरंग हरी
ReplyDelete