चंद्रशेखर आझाद यांची माहिती
चंद्रशेखर आझाद यांचा जन्म 23 जुलै 1906 रोजी भावरा अलीराजपुर मध्य प्रदेश येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव सीताराम तिवारी व आईचे नाव जगरानी देवी होते . त्यांचे पूर्वज उत्तर प्रदेशातील पण वडील मध्यप्रदेशातील स्थायिक झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण भावरा या गावात झाले नंतर पुढील शिक्षणासाठी आईच्या इच्छेनुसार संस्कृत शिकण्यासाठी वाराणसी येथे गेले . इसवी सन 1921 मध्ये त्यांनी महात्मा गांधी यांच्या असहकार चळवळीत सहभाग घेतला . त्यावेळी पंधरा वर्षाचे होते .त्यावेळी त्यांना पोलिसांकडून अटक झाली .
तिथे त्यांनी आपले आडनाव आझाद असे नोंदवले तेच नाव त्यांनी आपल्या आयुष्यात काय वापरले . त्यावेळी त्यांना 15 फटक्यांची शिक्षा झाली प्रत्येक फटक्याला ते वंदे मातरम अशी घोषणा देत होते. ते जरा घाबरले या डगमगले नाहीत. मोठ्या शौर्याने त्यांनी सामना केला. त्यांचा नेम अचूक होता तो कधी चुकायचं नाही . त्यांनी लहानपणापासूनच त्याचा सराव केला होता. त्या शिक्षण त्यांचं चंद्रशेखर आजाद हे नाव प्रसिद्ध झालं .
त्यांनी स्वतंत्र व शस्त्र अशी स्वतःची जय भारत आजाद संघटना स्थापन केली .त्यांच्या या संघटनेत अनेक युवक सामील झाले . त्यातील भगतसिंग राजगुरू सुखदेव हेही होते चंद्रशेखर आजाद यांनी 1928 मध्ये लाहोर येथे इंग्रजी अधिकारी सँडर्स याची हत्या करून लाला लजपत राय यांच्या हत्येचा बदला घेतला .
त्याच्या संघटनेने नंतर सरकारी खजानेही लुटले आणि संघटनेसाठी पैशाची व्यवस्था करायला सुरुवात केली . ते म्हणायचे की भारतीयांचेच आहे ते देश स्वतंत्र करण्यासाठी उपयोगी आले पाहिजे . त्यांनी काकोरी कांड आणि सक्रिय सहभाग घेतला इंग्रज सरकार त्यांच्या कारवायांना हैराण झाले आणि कारवाई त्याच्या हाती लागले नव्हते .यासाठी इंग्रज सरकारने त्यांच्यावर दहा हजाराचे ठेवले होते इलाहाबादच्या आल्फ्रेड पार्कमध्ये ते सुखदेव सिंग यांच्या जोडीला पुढील वाटचाली बद्दल चर्चा करत असताना . त्यांच्यावर अचानक हल्ला केला त्यांनी पोलिसांवर गोळीबार करून सुख दीवाना पळून जाण्यास मदत केली . परंतु ते मात्र अडकले हे सतत वीस मिनिटे पोलिसांची सामना करत होते कोणतेही पोलिस अधिकाऱ्याची त्याच्या जवळ येण्याची हिंमत होत नव्हती .
अखेर त्यांच्या गोळ्या संपल्या शेवटचे एक गोळी त्यांनी स्वतःला जोडून आपला आयुष्य संपवलं पण ते या जुलमी इंग्रजांच्या हाती लागले नाहीत . मी आझाद आहे आणि आझाद राहणार आहे हे त्यांनी खरे करून दाखवले. 27 फेब्रुवारी 1931 साली त्यांनी आपल्या भूमीसाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.✒️💐
.jpeg)
Comments
Post a Comment